संस्कृतमधे एक प्रसिद्ध म्हण आहे - ‘नास्ति विद्यासमं चक्षुर्नास्ति मातृ समोगुरु:’ याचा अर्थ असा कि, जगात विद्ये सारखं क्षेत्र आणि आई सारखा गुरु नाहीये, मुलांच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त कोणाचा प्रभाव पडत असेल तर आईचा आणि स्त्रियांच्या प्रगतीत माय बनून प्रथमत: उभी राहिली ती सावित्रीच. सामाजिक व शैक्षणिक प्रगतीपासून जेव्हा हा समाज कोसो दूर खितमत पडला होता तेव्हा ज्योतिबा आणि सावित्रीनेच या समाजाला उभारी दिली आणि समाजात प्राण पेरला.
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य. स्त्रियांचा मागासलेपणा, शेतकऱ्याची पिळवणूक आणि होणार शोषण व समाजातील जातिभेदता पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा जोतिबांनी निश्चय केला शेवटच्या श्वासापर्यंत ते झटले सुद्धा आणि त्यांनी त्यांना हवा तसा समाज निर्माण करायचा खूप प्रयत्न केला आणि तसा समाज घडवला. इ.स. १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या भिडे वाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा जोतिबांनी स्थापन केली, या शाळेतील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपविली. यानंतर जोतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
सावित्रीबाईंना दगडधोंडे, शेण अंगावर घ्यावे लागले. शिवाय स्त्री आणि पुरुषांचे शिक्षणही वेगळे असावे, असाही एक वाद होता. स्त्रियांना बालसंगोपन, गृहव्यवस्थापन आणि पाककौशल्याचे शिक्षण दिले पाहिजे, जेणेकरून त्या उत्तम पत्नी, सुमाता आणि आदर्श गृहिणी होऊ शकतील. याशिवाय वेगळ्या शिक्षणाची गरज काय? शेवटी बायकांना चूल आणि मूलच तर सांभाळायचं आहे, असाही त्या वेळी सूर होता. पण ज्योतिबाना ते मान्य नव्हतं, स्त्रियांना सुद्धा व्यवसायीक आणि व्यावहारिक शिक्षण असावे या मताचे ते. आज जे सर्व क्षेत्रात स्त्रिया भरारी घेताय ना ते त्यांच्या दूरदृष्टीमुळेच.सावित्री आणि ज्योतिबाबानी मिळून स्त्री कल्यानासाठी आपले संपूर्ण जीवन वाहून दिले. त्यांच्या शैक्षणिक सुधाराची तर बातच वेगळी होती, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण त्यांनी पोहचवले, एवढेच नाही जाती विभाजन, महिलांना अधिकार, बाल विवाह, विधवा विवाह अश्या एक नाही अनेक गोष्टीसाठी भारतात प्रथमत: लढनारे तेच. ज्यांनी आपलं सर्व आयुष्यात स्त्री आणि दलित या साठीच त्यागुण दिल त्याच महामानव आणि त्यांच्या पत्नीला आजचा समाज विसरून गेला आहे. पुण्यतिथी आणि जयंतीपर्यंतच फुले दापत्य सीमित राहावे या पेक्षा आपल्यासाठी लाजिरवानी गोष्टच शिल्लक राहिलेली नाही.
ज्या माणसाने संविधान लिहले त्या माणसाने ज्याला गुरु बनवले ते ज्योतिबा, ज्यांना संपूर्ण जग भारतीय सामाजिक क्रांतीचा जनक मानतो हे तेच ज्योतिबा. ज्यांच्या संघर्षातून शेती कायदा आला, शेतकऱ्यांना जगायचा अधिकार मिळालं तेच फुले दापत्य आज आपल्याकडून वगळले जावे यापेक्षा आपल्यासाठी निंदनीय बाब नाही. ज्या ज्योतिबाचा सन्मान 1883ला प्रत्येक्षात इंग्रजच्या महाराणीन कराव, स्त्री शिक्षनाचा आद्यजनक म्हणून ज्यांचा गौरव व्हावा त्यांनाच खऱ्या सन्माना पासून आपण दूर ठेवावं हे कोणालाच पटन्यासारख नाही. ज्या सावित्रीआईने भारतातील स्त्रियांना भारतरत्न घेण्यासाठी घडवाव; ज्या बाईन देशाला स्त्री पंतप्रधान, राष्ट्रपती बनू देण्यासाठी सामर्थ्यवान बनवावं त्याच सावित्रीला डावलल जावं कोणता न्याय असावा हा?
ब्राम्हण आणि भांडवलशाही धार्जिण्या सरकारन घटना धूडकावून लावली, कलम 18 चा गैरवापर केला. घटनेत कुठेच असे नमूद नाही कि, मरणोपरांत समाजात विशिष्ट स्थान मिळणारया व्यक्तीस, महामानवास सन्मान देऊ नाही म्हणून. मग जेव्हा फुले दापत्यासाठी भारतरत्नाची मागणी होते तेव्हाच का नियम बदलवले जातात?. कोणालाही उठून सुटून भारतरत्न दिला जातो, प्रत्येक्षात त्याला ते पात्र नसताना सुद्धा आणि ज्यांना तो सन्मान मिळायला हवा ते मात्र त्या पासून वंचित. आणि एवढं सर्व होत असताना सत्तेपाई लालची झालेली तळवे चाटणारे नेते मात्र मुके, बहेरे होऊन बसलेले असतात आणि आंधळी जनता त्याच वेळी थाळी वाजवत, दिवे लावत आपल्या अंधभक्तीच जगाला दर्शन घडवून आणत असते.
जेव्हा सावित्री आणि ज्योतिबासाठी भारतरत्नची मागणी चालली असते ना तेव्हाच कोणत्या तरी एका बनारसच्या व्यक्तीला मरणोपरांत भारतरत्न दिल जात आणि आता फुले दापत्याला द्यावे लागेल म्हणून निर्णय घेतला जातो कि, यांनतर मरणोपरांत भारतरत्न दिल्या जाणार नाही आणि आपले नेते त्या वेळेस मात्र संसदेत मुकाट्याने बसलेले असतात हे मात्र आश्चर्यकरून सोडणार.. तुम्ही रहा शांत, मी पण शांत बसतो. पण जेव्हा येणारी पिढी सावित्री आणि ज्योतिबा समजून घेईल ना, तेव्हा तुम्हाला नक्कीच विचारेल कि,यांने एवढ्या कमी वयात भारत रत्न मिळालं, ते पण खेळासाठी आणि हे ज्यांनी भारतीय शिक्षनाची मुहूर्तमाळ बांधली ते मात्र वंचित यांना का भारत रत्न नाही? मग द्या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर, जे प्रश्न या घडीला मला सुद्धा पडलाय.
- मनवर सुनील
(मुक्तपत्रकार)
