येत्या 2022 मधे 8 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे, यातील पहिली 4 राज्ये व काश्मीर राज्य सत्तेत असलेल्या सरकारसाठी किंगमेकर ठरणार आहेत. पैकी 5 राज्यात भाजपा, एका राज्यात काँग्रेस व एका राज्यात अन्य सरकार, जम्मू काश्मीरमधे राष्ट्रपती राजवट सध्या विराजमान आहे. उत्तरप्रदेश, गुजरात, जम्मूकाश्मीर व पंजाब या राज्यातून सर्वात जास्त आमदार निवडून जातात आणि या निवडणुकीत 2024 ची सत्ता कोणाकडे जाईल हे ठरणार आहे. गुजरात आणि उत्तरप्रदेश हे भाजपाचे बालेकिल्ले आहेत, या राज्यातून सत्ता जाणे म्हणजे पार्टीचे नाक कापने आहे. सत्तेत यायचे तर साम, दाम, दंड, भेद या सर्व गुणांचा कसा वापर करायचा हे संघ परिवाराला नक्कीच माहिती आहे. म्हणूनच संघ परिवार प्रयोजित धर्मसंसदा घेऊन हिंदूराष्ट्र बनणार असा आव आणला जातोय आणि हिंदू लोक त्याला बळी पडतांना दिसून येत आहे. निवडुक कशी लढायची आणि कशी जिंकायची हे संघपरिवाराला खूप चांगले माहिती आहे पण समजा उत्तरप्रदेश किंवा गुजरात हातून गेले तर काय होईल? खाली मागच्या डिसेंबर महिन्यात घेन्यात आलेल्या विविध भागातील कट्टर हिंदू धर्मसंसदेची माहिती दिली आहे, ती वाचल्यावर लक्ष्यात येते कि, पुढील काळात काय घडणार आहे. हिंदू राष्ट्राची मागणी सात वर्षानंतर आताच का साधू संतांनी धरून ठेवली असावी, या सर्व धर्मसंसदा एवढ्या वादग्रस्त का ठरल्या असाव्या. ज्या प्रकारे मुस्लिम, शीख आणि इतर धर्मावर प्रत्येक धर्मसंसदेत भडकावूभाषण देण्यात आले, त्यावरून पुढील काळात ते सुरक्षित असतील का? समजा वरील मुख्य राज्यात संघाची सत्ता गेली तर? दुसरा गोद्रा कश्यावरून घडून येणार नाही. वाचा विचार करा.
हरिद्वारमधील धर्मसंसद -
लाखो हिंदू लोक व हजारो कट्टर हिंदू कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्तराखंड मधे अशीच एक धर्मसंसद 19 डिसेंबर 2021 च्या दरम्यान पार पडली. या संसदेत देशात इतर ठिकाणी झालेल्या भाषना प्रमाणेच मुस्लिम व अल्पसंख्यांक ख्रिश्चन लोकांना टार्गेट करण्यात आले होते. हरिद्वारच्या या धर्म संसदेत ज्याप्रमाणे मुस्लिम समुदायावर भडकावू भाषण देण्यात आले होते त्यानंतर मुस्लिम समुदाय त्यावर आक्रमक होणे साहजिकच होते. आता उत्तर प्रदेश मधली मुस्लिम जनता आक्रमक झालेली दिसून येते. उत्तर प्रदेश मधल्या विविध मुस्लिम संघटना सध्या एकत्र आल्या असून त्यांच्या म्हणन्यानुसार आम्ही शांती प्रस्थापित व्हावी म्हणून स्वतःचे जीव पण देऊ शकतो, आमच्या विषयी हिंदू संघटना फक्त द्वेष पसरवीत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.
मुस्लिम संघटना इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे संस्थापक अध्यक्षांनी मुस्लिमांना येत्या शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भारतात विवीध ठिकाणी भरलेल्या धर्म संसदेचा निषेध म्हणून हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आत्मबलिदान करण्याचे आव्हान केले आहे. पत्रकारांशी बोलतांना मुस्लिम उलेमा तौकीर रजा म्हणाले कि, मुस्लिम समुदायाने कित्येकदा अश्या मुस्लिम विरोधी घडलेल्या गोष्टीचा विरोध केला आहे पण सरकार त्यावर कोणतीही कार्यवाही करायला तयार नसते. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधतांना तौकीर रजा म्हणाले कि, आमच्या उलेमानी यापेक्षाही मोठ्या तीन बैठका आताप्रयन्त घेतल्या पण आम्ही कधीच त्यांचा उल्लेख धर्मसंसद म्हणून करत नाही. ज्याप्रकारे धर्म संसदेत भडकावू शब्दांच्या वापर करण्यात आला, तश्या शब्दाचा वापर आमचे धर्मगुरू कधीच करत नाही. आम्ही जेवढे शक्य होईल तेवढे शांतीने, प्रेमाने आणि देशपरी समर्पनाने राहण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आमच्या धर्माच्या सभेत दुसऱ्या धर्मविषयी कधीच द्वेषपर भाषण देत नाही आणि दिले असते तर सरकारने कधीच आम्हाला देशद्रोही, राष्ट्रविरोधी म्हणतं कारागृहात टाकले असते. हरिद्वारमधे आयोजित धर्मसंसदेत दिल्या गेलेल्या भाषणात हिंदूना आव्हान करण्यात आले होते कि, देशातील 20 लाख मुस्लिम लोकांची ते हत्या करू पाहत आहेत,जे कि खरंच देशातील कायदे व्यवस्थेसाठी लाजिरवाणी बाब आहे, यावर उलेमा म्हणाले कि, सरकार 20 लाख मुस्लिमांना जर मारू पाहत आहेत तर आम्ही तयार आहोत मरायला, सरकारणे आपली माणसं आम्हाला मारण्यासाठी पाठवावी.
काय आहे हरिद्वार धर्मसंसद वाद?
उत्तराखंड राज्याचा हरिद्वार मधे 17 ते 19 डिसेंबर 2021 दरम्यान काही हिंदू नेत्यांनी आणि कट्टर हिंदू लोकांकडून एका धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते, अश्याच धर्मसंसदा त्या कालावधीत देशातील काही मोजक्या शहरात भरविण्यात आल्या होत्या. हरिद्वार धर्म संसदेमधे मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक लोकांविरोधात द्वेषपर भडकावू भाषण दिले गेले आणि त्यांच्या नरसंहाराची गोष्ट करण्यात आली. या धर्मसंसदेचे व्हिडिओ वायरल झाल्यानंतर सरकारने तपासासाठी एक एसआयटीची स्थापना केली. उत्तराखंड पोलिसांनी त्यांनतर या प्रकरनावर शत्रूतेला प्रोत्साहन देणे 153A आणि 298 धार्मिक भावना भडकावने अश्या आयपीसीतील कलमा लावत खटला दाखल केला आहे. या खटल्यात 10 लोकांना मुख्य आरोपी घोषित केले असून सुप्रीम कोर्टाच्या 70 वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
वसीम रिजवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी, मुख्य आरोपी धर्म संसद -
या सर्व धर्म संसदेत मुख्य आरोपी असलेले जितेंद्र नारायण त्यागी म्हणजे कालचे शिया वफ्क बोर्ड या मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष वशिम रिजवी आहेत. वसीम रिजवी पूर्वी समाजवादी पार्टीमधे होते, त्यानंतर शिया वफ्क बोर्डाच्या जमीन घोटाळ्यानंतर त्यांनी बीजेपीत प्रवेश केला आणि डिसेंबर 2021 मधे हिंदू धर्मात प्रवेश केला. जितेंद्र नारायण त्यागी उर्फ वसीम रिजवीने केलेल्या धर्मापरीवर्तनानंतर वसीम रिजवीचे सूर आता मुस्लिम विरोधी झाले आहे. जितेंद्र त्यागीनी धर्मसंसदेच्या दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल केला होता, त्यात त्यांनी सांगितले कि अश्या धर्म संसदा आम्ही पूर्ण भारतात घेऊ, जिहादी लोकांसमोर आम्ही मुळीच झुकणार नाही. त्या व्हिडीओमधे वसीम रिजवी म्हणतो कि, हरिद्वार मधे एक धर्म संसद काय घेतली गेली, साऱ्या मुस्लिमात व खास करून मुस्लिम धर्मगुरुत चांगलीच बैचैनी निर्माण झाली आहे. तिकडे नसीरुद्दीन शाह 20करोड लोकांना जिहाद करा म्हणून आव्हान करत आहेत तर त्याच्याबरोबर ओविसी देशात आग ओकत आहेत. हे एवढेच नाही पाकिस्तान ला सुद्धा आमच्या धर्म संसदेची झळ लागेलली आहे त्यामुळे पाकिस्तान काहीही बोलत सुटला आहे. याचा सर्वात मोठा परिणाम उत्तराखंडच्या डिजिपी वर झालेला दिसतो, धर्म संसदेच्या नावावर कोणत्याही साधुला धरून ते कारागृहात टाकत आहे.
पालघरमधील धर्मसंसद -
गीता जयंती म्हणजेच, भगवतगीता प्रगटीकरण दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या कट्टर हिंदू संघटनांनी भारतातील विविध शहरात अफाट अश्या हिंदू धर्मसभेचे आयोजन केले होते. अशीच एक सभा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात भरविण्यात आली होती ज्यात लाखो हिंदू बांधवानी व हजारो कट्टर हिंदू माथेफिरुंनी त्यात सहभाग घेतला होता. या अफाट हिंदू धर्मसभेचे प्रमुख म्हणून तेलंगणाचे भाजपा आमदार आणि स्वतःला कट्टर हिंदू म्हणवून घेणारे टायगर राजा सिंग हे होते. टायगर राजा यांनी या कार्यक्रमात मुस्लिम समुदाय आणि त्यातील काही ठळक लोकांवर भडकावू टिपण्या केल्या, ते ओविसी बंधू विषयी बोलतांना म्हणाले कि, अकबरुद्दीन ओवेसी हे आता पागल झाले आहेत, त्यांना मधे मधे वेडेपणाचे झटके पडत असतात म्हणून ते मला 15 मिनीट द्या, मला 15 मिनीट द्या असे ओरडत फिरत असतात. टायगर राजा इतके बोलून एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी ओविसी बंधूना देशद्रोही असल्याची उपादि देऊन टाकली. टायगर राजा ओवीसी बंधुवर टीका करतांना म्हणतात कि, हे हिंदू राष्ट्र आहे आणि ओविसी बंधू देशासाठी घातक ठरू शकतात त्यांना लवकरात लवकर कारागृहात टाकायला हवे, जनेकरून देशाचे नुकसान होणार नाही. दोघे बंधूनी मिळून देशाची एकता नष्ट केली आहे, त्यांच्यामुळे देशील शांतता भंग झाली आहे. त्यांना 15 मिनिट काय तर आम्ही 15 तास, 15 वर्ष देऊ पण आधी ओविसी बंधूनी भडकावू भाषण देने लवकरात लवकर बंद करायला हवे. ते पुढे म्हणतात कि, जर खरोखरंच ओविसी एकाच बापाचा असेल तर, त्याने माझ्या समोर येऊन उभ राहायची हिम्मत दाखवली पाहिजे.
मी तुम्हा सर्व हिंदू कार्यक्रर्त्यांना आव्हान करतो कि, सनातन हिंदू धर्माविषयी विष ओकणाऱ्या मुन्नवर फारुकी आणि अन्य हिंदूधर्म विरोधी लोकांना तुम्ही धडा शिकवायला पाहिजे असे ते म्हणाले. या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे पालघर जिल्हाध्यक्ष कुमार नागसेठ, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंदन सिंह, एस. पी. सिंह, श्रीपाद पाटील, काच्छू शेट्टी आणि इतर विविध हिंदू संघटनेचे लाखो हिंदूवादि कार्यकर्ते हजर होते. या कार्यक्रमात हिंदूसभेने आरएसएस या संघटनेचे आभार म्हाणले, खऱ्या अर्थाने आज देशात हिंदू आरएसएसमुळे टिकून असल्याचे टायगर राजा म्हणाले, ते म्हणाले कि लोकांनी खास करून सळसळत्या रक्ताच्या तरुणांनी आता बजरंग दल, विश्व हिंदू परिषद अश्या हिंदू संघटनांशी स्वतःला जोडायले हवे, तीच आजची गरज आहे. असे म्हणत हिंदू लोकांनी आपला धर्म वाढवायला हवा आणि त्यासाठी आपल्या धर्माचा लागलं तेवढा प्रचार हिंदूंनी करायला हवा असे ते म्हणाले. पालघर मधील ही धर्मसंसद मुळातच वादग्रस्त होती परंतू त्याची दखल न सरकाने घेतली आणि नाहि पोलिस यंत्रनेणे त्यावर कार्य वाही केली एवढी निष्काळजी आपली सिस्टीम असू शकते यावर प्रश्न चिन्ह उभे करण्यासारखे आहे, या सभेत खुप सारे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते जसे की, धर्म परिर्तन करुन आणनाऱ्या लोकांना हिंदुनी धडा शिकवायला हवा, म्हणजे ख्रिश्चन मिशनरिजना व मुस्लिम समुदायाकडून बदला घेऊ असा त्याचा अर्थ होता. लक्षात आणून द्यायची बाब म्हणजे पालघर मधील धर्म संसदेत मुख्य पाहुणे म्हणुन भाषण करनाऱ्या टी. राजा सिंग यांच्यावर ७४ पेक्षा जास्त विविध पोलिस केसेस चालू आहेत.
छत्तीगडच्या रायपूरमधे अशीच एक धर्मसंसद आयोजित करण्यात आली होती, ही दोन दिवशीय धर्म संसद वादात सापडल्यामुळे वेळेपूर्वीच संपविण्यात आली. सदर कार्यक्रमात सहभागी झालेले मुख्यमंत्री भूपेश बघेल कार्यक्रमात वाद पेटतोय बघताच कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघून गेलेत. कार्यक्रमात मुख्य आयोजक राम सुंदर महाराज व कालिचरण महाराज यांनी महात्मा गांधीची बदनामी केली व गोडसेचे अभिनंदन केले, या कार्यक्रमात देशाभरातील हिंदू धर्म अनुयानी, महामंडलेश्वर आणि कट्टर हिंदू कार्यकर्ते उपस्थित होते. मूळचे अकोल्याचे असलेले कालिचरण महाराज, जे कि शिवस्रोत पठनाच्या एका व्हिडीओने वायरल झाले होते त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर अपमानस्पद भाषण केले आणि नथुराम गोडसेची प्रसंशा केली.
रायपूरच्या या धर्मसंसदेच्या मंच्यावरून अमर्यादित निंदनीय व भडकावू शब्दाचा वापर करण्यात आला, पालघरच्या धर्म संसदेप्रमाणेच या धर्मसंसदेत ओविसी बंधूना टार्गेट केले गेले. हिंदूंना उद्देशून बोलतांना कालीचरण महाराज म्हणाले कि, मतदान करण्याआधी निश्चित करा कि, तुम्ही फक्त कट्टर हिंदू असलेल्या नेत्यालाच निवडून देत आहात भलेही मग तो कोणत्याही पक्ष्याचा असो. याच कार्यक्रमात जुना आखाडाचे प्रबोधानंद महाराज यांनी हिंदूनी हिंदूंच्या धर्मरक्षणासाठी शस्त्र सोबत ठेवायला हवे असा सल्ला दिला होता. या दोन दिवसाच्या धर्मसंसदेचा विषय होता, भारताला एक हिंदू राष्ट्र कसे बनवता येईल. या कार्यक्रमात एक व्यक्ती सोडून सर्वांनी हिंदू राष्ट्र होण्यावर जोर दिला आणि आक्षेपार्ह भाषण केले. कुरुक्षेत्राचे मठाधीश स्वामी स्वरूपानंद म्हणाले कि, या देशात 30करोड मुस्लिम व 15 करोड इसाई लोक राहत असतांना हिंदू राष्ट्राची इच्छा करणे व त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे घातक असू शकते, भारत हे हिंदू राष्ट्र नाहीच.
- अयान शेख (मुंबई)