हिंदू राष्ट्र कश्यासाठी?, येथे संविधान अमान्य असलेले मिनी रामराज्य आधीपासूनच अस्तित्वात...


     एकीकडे संविधानानुसार देश चालविनं त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे जे स्वतःला आम्ही भारतीय आहोत असे समजत असतात, सत्तेत बसलेले लोक संविधानानुसारच सत्ता सांभाळतात आणि संविधानानुसारच संविधानाच्या मूळ चौकटीला हात न लावता देशात परिवर्तन होत असते, मुळात देशात काहीही करायचे झाल्यास कल्याणकारी राज्याची सीमा आणि त्याचबरोबर संविधानाची मर्जी राखणे तेवढेच महत्वाचे आहे जेवढे भारत देश म्हणून राष्ट्राला आबाधित ठेवणे. भारतीय संविधानाचा सारनामा काय म्हणतो तर, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही,गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस: सामाजिक,आर्थिक व राजकीय न्याय, विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून संविधान लागू करतोय असा भारताचा प्रत्येक नागरिक, संविधान सभेत पाठवलेल्या सदस्याच्या अंतर्गत म्हणतांना दिसतोय. म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिक जेव्हा भारताचा नागरिक असतो तेव्हा तो स्वतःहून मी संविधानाप्रति एकरूप राहिलं अशी ग्वाही देत असतो, याचाच अर्थ भारताच्या प्रत्येक नागरिकाला संविधान मान्य करणे तेवढेच महत्वाचे आहे जेवढे कि, भारताचा नागरिक म्हणून भारतात राहणे. वर नमूद केल्याप्रमाणे भारताचा संविधान म्हणतो कि, भारत हा लोकशाही,सार्वभौम, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे याचाच अर्थ भारत हा विविध जातीचा, धर्माचा, पंताचा,समुदायाचा देश आहे, विविधेत एकता हीच खरी भारताची ओळख आहे. पण अलीकडे सोशल मीडियापासून ते सामान्य कट्टर हिंदू व कट्टर साधूसंतांपर्यंत धर्मअंध लोकांनी उचलून धरलेला मुद्दा कि, भारत हा हिंदूराष्ट्र व्हावा या सर्वांना बाधा पोहचवून देशाची लोकशाही व्यवस्था नष्ट करू पाहत आहे.

   2 ऑक्टोबर पर्यंत हिंदू राष्ट्र बनवा अथवा मी जलसमाधी घेईल अशी धमकी जगतगुरू परमहंस आचार्य महाराज यांनी भारत सरकारला दिली होती, धर्माचे नेतृत्व करणाऱ्या एकाद्या महाराजांने हे करावे हे खूप लज्जास्पद आहे. कोणताही धर्म दुसऱ्याधर्मावर गदा आणून उभा राहूच शकत नाही आणि स्वतःला सर्व ज्ञानी म्हणणाऱ्या महंतांना हे सुद्धा माहिती नसावे ही आश्चर्याची बाब आहे. हे बुवाबाबा येथेच थांबत नाहीत तर पुढे हे अशी सुद्धा मागणी करतात कि, भारत सरकारने सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचे नागरीकत्व रद्द करावे, असे सरकारने 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत नाही केल्यास ते जल समाधी घेणारं होते, परंतु असे काहीही घडलेले दिसले नाही. बाबांनी आपला शब्द तर पाळला नाही, पण धर्माच्या नावाखाली संविधान डावलन्याचं आणि दुसऱ्या धर्मविषयी लोकात विष कालवण्यात ही लोक यशस्वी होत आहेत यात आता शंका नाही. बाबा परमहंस हळी सर्व गरोळ ओकतांना हे सुद्धा म्हणाले कि, आमच्या संताकडे मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांची नागरिकता संपविण्यासाठी त्यांनी काही प्लॅन आखला आहे कि नाही याची मला खात्री नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे या आधी सुद्धा बाबा परमहंस यांनी अयोध्या मंदिर आणि हिंदूराष्ट्रा आंदोलन, आमरण उपोषण केले आहे स्वतः भारताच्या गृहमंत्र्यांनी त्यांना हिंदू राष्ट्राचे आश्वासन दिले होते ही खूप विचार करायला लावणारी व संविधानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारी बाब आहे.

या हिंदू राष्ट्राविषयी संघाला सुद्धा किती प्रेम आहे समजून घेऊया, 2 ऑक्टोबर 2019 च्या एका कार्यक्रमात बोलतांना सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात कि, संघाला कोणत्याही विचारधारेत बांधले जाऊ शकत नाही व संघ कोणत्याही विचारात विश्वास ठेवत नाही आणि हे आम्ही आमच्या विविध पुस्तकात मांडली आहेत ज्यात एस.एस. गोवळकर यांच्या बंच ऑफ थॉट्स चा सुद्धा सामावेश आहे. ते पुढे त्या भाषणात म्हणतात कि, संघ फक्त एकाच मुल्यावर कार्य करते भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्यामुळे हिंदू राष्ट्रासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही. हा कट्टर हिंदूराष्ट्राचा मुद्दा इथेच संपतो असा नाही, भारतीय संविधान आणि न्यायालय एकमेकाचे अस्तित्व आबाधित ठेवण्यासाठी एकाप्रकारे एकमेकाला पूरक असतात पण समजा, जर न्यायालयच संविधानाला डावलून सरकारला भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी पाऊल उचला म्हणून आदेश देत असेल तर मग?(नंतर न्यायालयाने आपला निर्णय मागे घेतला). 13 डिसेंबर 2018 ला मेघालय उच्च न्यायालयाने एका विषयावर निर्णय देतांना सांगितले होते कि, भारताच्या फाळणीनंतरच भारताला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करून द्यायला हवे होते. अजून ती वेळ गेलेली नाही, आता ती योग्य वेळ आहे. या सर्व गोष्टीचे महत्व फक्त वर्तमान मोदी सरकार समजू शकते आणि योग्य पाऊल उचलू शकते असे सांगितले होते. त्यामुळे या सर्वावरून लगेच लक्षात येते कि वर्तमान सरकार आणि त्याच्या फेवर मधील प्रशासन संविधानाला किती महत्व देते.

खरं तर ज्या लोकांना भारत हिंदूराष्ट्र हवाय त्यांची खरी समस्या आधी समजून घ्यायला हवी. ज्यांना हिंदूराष्ट्र हवाय त्यातील पुष्कळश्या लोकांना माहिती नसेल कि, राष्ट्र ही संकल्पना काय असते आणि राष्ट्राचा नेमका अर्थ काय होतो. जेव्हा हे भारताला हिंदूराष्ट्र म्हणतात तेव्हा त्यांच्यामते फक्त हिंदू लोक राहत असलेला देश होतो,जसे कि नेपाळ हा आधी हिंदू राष्ट्र होता परंतु आता नाही व पाकिस्तान आज स्वतःला मुस्लिम राष्ट्र समजून घेतो पण बाकि अमुस्लिम लोकांना येथून चालते व्हा असे सांगत नाही मुळात हिंदूराष्ट्र हवा म्हनणाऱ्या लोकांना एक राष्ट्र हवा नसतो तर त्यांना स्वतःचा एक वेगळा देश हवा असतो. जेव्हा आपण मुस्लिम राष्ट्र असे म्हणतो तेव्हा एक गोष्ट होऊ शकते कि मुस्लिम हा एक वंश आहे किंवा एक समाज आहे. परंतु अश्याप्रकारे आपण हिंदू एक समाज किंवा वंश आहे असे म्हणू शकतो का? अर्थातच नाही आणि जर तुमचे उत्तर माझ्या उत्तरापेक्षा वेगळ असेल तर चार वर्ण, वेगवेगळ्या जाती,कित्येक समुदायातला एक समुदाय आणि कित्येक वेगवेगळ्या संस्कृतीचा एकत्रित बंच, काय ब्राम्हण आणि क्षत्रिय एक आहेत, क्षत्रिय आणि वैश्य?, काय शूद्र आणि ब्राह्मण एक आहेत? अर्थातच नाही. ज्या समुदायाच्या मंदिरात तहान लागली म्हणून त्याच समुदायाचा एकादा शूद्र पाणी प्यायला जातो आणि उच्च जातीचे लोक विटाळ झाला म्हणून त्याला पाठीची चामडी जाई पर्यंत मारतात तो एक वंश एक समाज कसा होऊ शकेल, त्यामुळे हिंदू फक्त एक समुदाय होऊ शकतो, धर्म नाही. यावरूनच हिंदूराष्ट्र ही संकल्पना किती योग्य आणि अयोग्य आहे समजून घ्यायला हवे.

परंतु भारताचे हे साधनसंपत्तीनी संपन्न मूठभर लोक ज्यांना सर्वकाही आवश्यकतेपेक्षा जास्त उपलब्ध आहे, तेच हिंदूराष्ट्राची गोष्ट छेडतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांना लोकशाही राष्ट्र नकोय तर त्यांना रामराज्य हवाय. याचा अर्थ लवकरात लवकर भारतातून लोकशाही संपावी आणि आणि रामराज्य यावं. तरी सर्वात मोठा प्रश्न असा पडतो कि, हिंदूच्या सर्व देवातून यांना रामाचच राज्य का हवयं क्रिष्ण आणि स्वतः गौतम बुद्धाला विष्णुचा अवतार म्हणणाऱ्या या लोकांना बौद्धाच राज्य का चालत नसावा, दुसरा प्रश्न यांना रामराज्यच हवयं तर ते कोणासाठी? कारण वर्णव्यवस्थेतेच्या राज्यात सामन्य लोकांचं काय होईल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर खूप सोप्प आहे, रामराज्य ही असे राज्य होते कि, जिथे राजा क्षत्रिय होता आणि शासनावर नियंत्रण ठेवणारे हे ब्राम्हण याचा अर्थ असा कि, रामराज्य ही संकल्पना अशी आहे कि, जो राज्य ब्राम्हणवाद्याच्या रिमोट कंट्रोलने चालेल आणि त्यांच्या मर्जीशिवाय झाडाचं पान पण हलणार नाही, त्यांना जे वाटेल तेच ते करणार. क्रिष्णाच्या काळात शासन ब्राम्हणांच्या नियंत्रनात नव्हते, क्रिष्णाने ब्राम्हणांच्या सांगण्यावरून डोळेझाकून कोणा निर्दोषची हत्या केली नाही. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असे कि, ब्राम्हणांनी जानवाच्या आधारावर स्वतःच्या फायद्यासाठी ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यांना आबाधित ठेवलं कारण मुळात हाच वर्ग हिंदूमधील उच्च वर्ग आहे आणि उरलेले अनुलोक, प्रतिलोम ज्यांना आज आपण दलित बहुजन वर्ग म्हणतो जो कि त्यांच्या दृष्टीने अस्पृश्य, मनुष्य म्हणून मोजता न येणारा आहे, म्हणूनच दलित बहुजन वर्गाला या वरच्या तीन वर्गानी कधीच जवळ केले नाही. पण आता देशात लोकशाही असल्यामुळे हा चौथा वर्ग या वरच्या वर्गाला टक्कर देत बरोबरी करू पाहत आहे आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे, ब्राम्हणांच्या सत्तेसाठी बहुजन वर्ग घातक ठरू लागला आहे त्यामुळेच आज यांना रामराज्य आणायची घाई झालेली दिसते.



आम्हाला सांप्रदायीक राष्ट्र नको, लोकशाही राष्ट्र हवयं -

दिल्ली दंगल नागरिकता संशोधन कायाद्याच्या बुरख्याखाली घडवून आणली गेली, या कायद्यात फक्त तीन देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व नाकारले गेले पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान कारण he तीनही देश मुस्लिम बहूसंख्याक राष्ट्र आहेत. त्यामुळे दंगल पाकिस्तानधर्जिनी होती असा बिनबुडाचा आरोप करणे काहीही फायद्याचे नाही, कारण हे देश काहीही केल्या तुमच्या CAA बिलाला विरोध करणार नाहित. ज्या वेळी देशात कोणतीही दंगल होत असते तेव्हा खर तर फक्त सरकार, समाज बदनाम होत नाही देश बदनाम होत असतो आणि असच काहीस करण्याचं धाडस मनुवादी प्रवृत्तीनी भीमाकोरेगाव दंगलीच्या वेळेस केल. संघटित होणाऱ्या बहुसंख्य बहुजन लोकांना कस शांत बसविण्यात येईल याचाच हा ट्रायल होता. दिल्ली दंगलीच्या वेळी ज्याप्रकारे अनेक हिंदू समुदायातील लोकांनी स्वतःच्या प्रणावर खेळून अनेक मुस्लिम लोकांचे प्राण वाचविले त्यावरुन एक गोष्ट निश्चित आहे कि कोणालाही हिंदू राष्ट्र अथवा मुस्लिम राष्ट्र नकोय. परंतु सत्ते साठी हापापलेला लोकांनी आणि हिंदू किंवा मुस्लिम राष्ट्र व्हावं म्हणून जलसमाधी घेऊ पाहणाऱ्या बाबाबुवा आणि मौलाना यांनी जी युद्धजनक परिस्थिती असल्याच भासवीले आहे, खरंच ही गोष्ट चिंता करायला लावणारी आहे. या राजकारणाचा निर्णय आता अश्याप्रकारे समोर येतोय कि, मुस्लिम समाज मुख्यधारेच्या प्रवाहापासून दूर लोटल्या जातोय आणि हे लोक हिंदू समुदायात मुस्लिमाविषयी शंका आणि तिरस्कार निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत आणि हे वाढत जाणार आहे. आपण हिंदू मुस्लिम एक आहेत असे म्हणून अभिमानाने मिरवू शकत नाही, कारण दिल्ली दंगलीत 40 लोकांची हत्या कारण्यात आली, धर्मअंध लोक दंगली घडवीण्यात यशस्वी झालेत आणि आपण दंगलीत हिंदू किंवा मुस्लिम म्हणून लढलोत ही काही अभिमानाने मिरवायची गोष्ट नाहीये. मुळात आपन सांप्रदायीकता जेथून वाढते त्याच्या मुळात जायला हवे आणि ते खोदून नष्ट करायला हवे. समाजात मारणारा गट अस्तित्वात नसायला हवा, तर वाचवणारा मोठा गट निर्माण करायला हवा किंबहुना देश असा असायला हवा कि तिथे वाचविण्याऱ्या गटाची गरजच पडायला नको. आपण आपली जबाबदारी, भविष्याची गरज आताच ओळखली नाही तर येणाऱ्या काळात जिथे बचाव करणारा गट अस्तित्वात नाही त्यासर्व लोकांच्या हत्या केल्या जातील आणि आपण बघे म्हणून शांत राहू. 

तुम्हाला या गोष्टीची कधी चाहूल सुद्धा लागली आहे का कि, भारतात सतत हिंदू मुस्लिम, हिंदु दलित दंगली - चकमक का होत राहतात, त्याच कारण काय असेल?, यातुन इतिहास कसा घडला आणि लिहला गेलाय, या सर्वानी आपल्या वर्तमानावर काय परिणाम झालाय आणि आपल्या सर्वांचं भविष्य किती सुरक्षित असुरक्षित झालंय. या सर्वावर जनजागृती व्हायला हवी, विचारवंतानी लोकात जाऊन त्या दुष्परिनामाविषयी लोकांना सांगायला हवे आणि लोकांनी यावर विचार करायला हवे. तेव्हा कुठे लोक आपले डोळे उघडतील, सर्व गोष्टीवरचा परदा उठेल. लोकांना येथल्या धर्मअंधाची व सत्तेसाठी पिपासलेल्या लोकांची राजनीति कळेल आणि लोक जागे होतील. सत्तापिपासू लोक सत्य झाकून, असत्याच्या आधारे जे समाजात अशांतता पसरवतात आणि त्याचा परिणाम लोकांचे मुडदेच्या मुडदे पाडतात हे सामान्य लोकांना कळायला हवं तेव्हा कुठे आपण देशाला विनशातून वाचवू शकू. लक्षात ठेवा जिथे सत्य संपविले जाते, तेथूनच अराजकतेला सुरवात होते. असत्य बोलणारा कधीच सांगणार नाही कि, सत्य बोलत नाही उलट तो दुसऱ्याने सत्य सांगितलेलं असत्य असल्याच सिद्ध करायला लागतो. या साठी भारतीय नागरिक म्हणून आपला विवेक जागृत ठेवा आणि त्याचा योग्य तिथे वापर करा. विवेक म्हणजे डोळे बंद करून प्रत्येक गोष्टीकडे न पाहता, विविध पॉईंट्सचे चष्मे लावून ते योग्य कि अयोग्य पारखने होय

हिंदू राष्ट्र बनवा नाहीतर मी जलसमाधी घेईल असा कांगवा करणाऱ्या या बाबा बुवाना खर तर संविधान नकोय, यांची खरी समस्या संविधान आहे कारण ते संविधानाला देशाचा संविधान नाही तर बाबासाहेबांच संविधान समजतात म्हणून ते संविधानाचा सन्मान कधीच करीत नाही. स्वतःला जगतगुरु म्हणवून घेणारे या बाबांना एक गोष्ट खात्रीशीर पणे माहिती आहे कि, संविधान असे पर्यंत देशातच काय तर राज्यात पण रामराज्य येऊ शकत नाही. (कित्येक गावावर रामराज्य सारखे उच्च जातीच्या लोकांचे राज्य सुरु आहे हे वेगळे) लोकशाही देशात रामराज्याची गोष्ट करणे म्हणजे संविधान गुंडाळून ठेवण्यासारखे आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारने संविधान बदलन्यासाठी एका समीक्षा समितीची स्थापना केली होती, तीने पुढे काम केले नसले तरी आज तीच परिस्थिती पून्हा वर्तमान सरकार मधे उद्भवली आहे. होऊ शकत सरकारने यावर काम पण सुरु केला असावा. पण जाता जाता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे कि, काय हिंदूराष्ट्र उभारनीचे काम संपत तर आले नाही ना, कारण यांना जे रामराज्य हवे आहे त्याची स्थापना तर कधीच झालीय, संविधान - लोकशाही असतांना सुधा यांनी मिनी रामराज्य उभारले कसे असेल याचा कधी आपण विचार केलाय का?.गोद्रा हत्याकांडात मुस्लिमांना जाळून मारण्यात आलं, काय हे रामराज्य नव्हता?, दिल्लीमधे दंगली घडवून आरोपी दलित व मुस्लिम बनविले गेले, काय हे रामराज्य नव्हता?, भीमा कोरेगावात दंगली घडवून दलित बहुजन वर्गातील कार्यकर्त्यांना व लेखक विचारवंताना कारागृहात टाकलं गेलं, काय हे रामराज्य नाही?, हाथरस मधे दलित मुलीवर गँगरेप करून तिच्याच घरच्यांना दोषी ठरवीने, काय हे रामराज्य नाही?. सोलापुरात बहुजन वर्गाला अंतसंस्काराच हक्क नाकारणं, काय हे रामराज्य नाही?, खोट्या पुराव्याने बाबरी मस्जिद खटला पलटवून त्यावर मंदिर बांधने आणि दंगली करणाऱ्या हिंदू लोकांना सोडून देने, काय हे सुद्धा रामराज्य नाही, सर्व काही ठरवून होणं, सत्ताधीश कोणी असला तरी नियंत्रक ब्राम्हण असणं काय हे रामराज्य नाही?.

....

अयान शेख,मुंबई
Izteeraab@gmail.com
Previous Post Next Post