महिला असुरक्षितता, बलात्कार आणि असहीष्णू भारतीय समाज -

 

           देशाची उपराजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी आता पूर्वी पेक्षा जास्त महिलांसाठी असुरक्षित झाली आहे. साकीनाका बलात्कार आणि खून प्रकरणानंतर मुंबईतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले जातं आहे आणि का प्रश्नचिन्ह उभे करू नये? कारण महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सुरक्षिततेची हमी उचलणाऱ्या मुंबईतच अलीकडे महिलांवरील बलात्काराच्या घटना ऐवढया वाढल्या आहेत कि, सामान्य माणूस मुंबईत राहायचा विचारच करू शकत नाही. मुंबईत 11 सप्टेंबर 2021 ला साकीनामा भागात 34 वर्ष्याच्या महिलेवर उत्तर प्रदेश मधील मोहन चव्हाण या आरोपीने बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या केली, ही दिल्लीच्या निर्भया केसची पुनरावृत्ती होती. आतापर्यंत मुंबई म्हणजे महिलांसाठी सुरक्षित शहर समजल्या जायचं, साकीनाका घटनेमुळे मुंबईची ही प्रतिमा दूषित झाली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात दिल्लीच्या निर्भया केसची पुनरावृत्ती झाल्यानंतर देश खडबडून जागा होईल आणि शासन, प्रशासन आणि समाजाला प्रश्न विचारेल असं वाटलं होत, पण असे काहीही झाले नाही. रोज होणाऱ्या बलात्काराशी आमचे काहीच देनेघेणे नाही असं झालंय, एवढंच काय दिल्लीत मागच्या आठवड्यात एका महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार करून तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले, तरी देश शांत होता याचे मला आश्चर्य वाटते. कारण महिलांचे सुरक्षा करणारे हातच कापले जातंय कारण तर ती महिला आहे म्हणून. अमरावतीत त्याच कालावधीत एक घटना घडली आणि त्याच वेळी चित्रा नावाच्या चार वर्ष्याची मुलगी हैद्राबादमधे याचं गोष्टीला बळी पडली. देश सामाजिक अत्याचार व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत असहिष्णू तर झाला नाही ना? असा प्रश्न पडणे आता साहजिक झाले आहे. वेळ एक गुपित आहे, जिचा उलगडा कोणालाच होत नाही. हीच वेळ कधी समोर चाल म्हणते  तर कधी तिचा   पडसाद कानावर नेहमीसाठी पडत राहतो; कधी कोपर्डीची छकलू  तर कधी दिल्लीची निर्भया  बनून. आज सुद्धा कोपर्डीच्या मुली दिवसाढवळा  घराबाहेर पडायला भितात, मग संध्याकाळ तर त्यांच्यासाठी दुरचीच गोष्ट. अश्या घटना काही भारतीय समजासाठी नवीन नाहीत, नेहमीच त्यांचा पडसाद  समाजात उमटत असतो आणि समाजाला त्यामुळे न भरून निघणारी हानी होतेच, पण तरी त्या समाजाला हादरून टाकणाऱ्या असतात. जिथे स्त्रियांना माणसा इतकीच संधी अथवा हक्क प्राप्त करून द्यायच्या गोष्टी चाललेल्या असतात, त्याच समाजात असे होणे फार विचित्र प्रवृत्तीचे असते हे यावरून लक्षात येते. आपल्या मुली, बहिणी, आया आणि बाया घराबाहेर सुरक्षित आहेत का? या गोष्टीचे तणाव आज- काल सर्वांनाच असने साहजिक झाले आहे. अश्या घटनेला बळी पडणारी आपली बहिण असू शकते, मुलगी असू शकते आणि ती नसली तर, कदाचित कधी तिच्या जागेवर आपल्याच समाजातील किंबहुना माणुसकी म्हणून एक स्त्री जी आपली कोणी नसली तरी एक मानव तर असतेच. म्हणजे ती आपल्या कुणाची तरी, कोनी तरी असेल का? किंवा आपलीच कोणीतरी असेल का? या विचाराने भारतीय समाजाला ती पोखरून काढते.

                 भारतात घडलेली पहिली बलात्काराची केस म्हणजे मुंबईतील अरुणा शानबाग केस. अरुणा शानबाग मुंबईतील एका प्रतिष्ठित दवाखान्यात नर्स म्हणून कामाला होती. त्याच दवाखान्यातील सफाईकामगार सोहनलाल वाल्मिकी याने तिच्या वर बलात्कार केला. बलात्काराची घटना तेव्हा नवी नव्हती, पण बलात्कार ही संकल्पना मात्र त्या वेळेस नवीन होती. त्यामुळे पोलसांनी सोहनलाल वर कोणत्याही प्रकारचे बलात्काराविषयीचे खटले भरले नाहीत. सोहनलालला सात वर्षाची शिक्षा झाली, सोहनलाल आज पण जिवंत आहे. अरुणा त्या नंतर ४२ वर्ष कोमा मध्ये होती, नंतर ती 2015 मधे मृत्यू पावली. जरी ही भारतातील पहिली बलात्काराची घटना असली तरी सरकार दरबारी ती नोंदविली  नव्हती. त्यावर कोणीही आवाज उठविला नव्हता म्हणून या घटनेला पहिली बलात्काराची घटना मानले जात नाही. अशीच दुसरी घटना आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील. मधुरा नामक आदिवासी मुलीची. मधुरावर दोन सैनिकांनी बलात्कार केला. हा भारतातील पहिला सामुहिक बलात्कार होता. या दोन्ही सैनिकांनावर जिल्हा न्यायालयात खटला भरण्यात आला. मात्र तिला न्याय मिळाला नाही. मधुराला व्येश्या म्हणून घोषित करण्यात आले. या सैनिक पुरुषाची सुटका म्हणजे भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीचा विजय आणि महिलावर होणाऱ्या  अत्याचाराची सुरवात होती. कोपर्डी खटल्यात ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील लोकांनी, खास करून मराठा बांधवानी आवाज उठविला त्याच प्रमाणे मधुरा खटल्याच्या वेळी सुद्धा चंद्रपुरच्या लोकांनी आवाज उठविला होता आणि हि घटना भारतातील पहिली बलात्काराची घटना होती कारण तिची बलात्कार म्हणून सरकार दरबारी नोंद झाली होती. अलीकडे भारतात बलात्काराच्या बातमीचे कव्हरेज करण्यावर व अत्याचार झालेला व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी मिडियाचा खूप मोठा हात सामान्य जनतेच्या पाठीशी आहे असे दिसते. एक प्रकारे न्याय हा मिडीयाच्या कव्हरेजवर आधारलेला नसला तरी त्यांचा न्याय मिळवून देण्यामागे खूप मोठा सहयोग असतो हे विसरून चालणार नाही. ज्या प्रमाणे मिडिया बातमी दाखवतील, त्याच प्रमाणे हा खटला समोर वळण घेत असतो हे आपल्या सर्वाना माहीतच आहे. मिडीयाच्या सहभागाचा पहिला खटला दिल्हिच्या प्रियदर्शनी मिथु खटल्यात पाहायला मिळाला. प्रियदर्शनी वकिलीची विद्यार्धिनी होती. संतोषकुमार सिंघने तिच्यावर बलात्कार केला, जिल्हा न्यायालयाने संतोषकुमारला सोडून दिले. प्रियदर्शनिला न्याय मिळाला नाही तेव्हा याच मिडीयाने पुढाकार घेऊन तिला न्याय मिळवून दिला होता. मिडीयाच्या दबावाने नंतर संतोषकुमारला फाशीची शिक्षा झाली.

    अशी एक समज समाजात असते कि, असे अत्याचार फक्त मागासलेल्या आणि अशिक्षित, आदिवासी भागातच होतात. पण ही समजच मुळात चुकीची आहे. कारण मानसाळलेल्या आरोपींना वेळ, काळ, समाज आणि परिस्थिती अशा कोणत्याच गोष्टीची समज नसते, त्याला फक्त मी पुरुष आहे याच गोष्टीचा फक्त माज असतो. १९९९ ला अशीच काहीशी घटना घडली, अंजना मिश्रा प्रकरण. अंजना मिश्रा ही ओडीसाच्या एक मोठ्या अधिकाऱ्याची पत्नी होती. ओडीसाच्या महाधिवक्तावर तिने छेडछानीचा खटला भरला होता. परंतु मुख्यमंत्रांनी त्या महाधीवक्तावर कोणतीच कार्यवाही होऊ दिली नाही. महाधिवक्ता आणि त्यांच्या सहकार्याने नंतर काही दिवसांनी अंजनावर रेल्वेत सामूहिक बलात्कार केला आणि ती मरण पावली. पण आजही त्यातील एक आरोपी फरार आहे. जर भारतात एका मोठ्या अधिकाऱ्याची पत्नी सुरक्षित नसेल तर आपल्या सामान्य लोकांची काही मजल. समाजातील काही लोक किती विचित्र असतात याचे उदाहरण म्हणजे, केरळ मधील सोमय्या खटला. सोमय्या रेल्वेने प्रवास करीत असतांना गोविन्दाचामी या चोराने आधी चोरी करून तिला रेल्वेतून बाहेर फेकले आणि मग जंगलात तिला शोधत तिच्यावर बलात्कार केला. यात तिला एवढ्या जख्मा झाल्या कि, ती उपचारादरम्यान मृत्यू पावली. गोविंदाला न्यायालयाने फाशी दिली. समाजातल्या समाजासाठी अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या महिलेवरच अत्याचार होणे; या पेक्षा भयानक काहीच असू शकत नाही. अशीच घटना आहे राजस्थानच्या भवरीदेवीची. भवरीदेवी एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांनी बालविवाहाविरोधात आवाज उठविला म्हणून १९९२ ला त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. भवरीदेवीला न्याय मिळाला नाही कारण आड आली ती पुरुषीसंस्कृती. तिच्या जिल्ह्यातील सरकारी डॉक्टरने तिची तपासणी करायला दिलेला नकार असो. कि, जिल्हा अधिकार्यांनी न केलेली कार्यवाही असो, सगळेच तिला आड आले. आज आपला समाज मंगळावर जाऊन वस्ती करण्याच्या विचारत असतांना अस काही विचित्र घडावं या पेक्षा शर्मनाक काही असूच शकत नाही. आपण कितीतरी विचाराने मागास आहोत याचीच हि एक प्रचीती. मुंबईत महिला पत्रकारावर झालेला बलात्कार असो कि, गोव्यात विदेशी महिलावर झालेला सामुहिक बलात्कार असो. हे सर्वच त्याची प्रचीती देतात कि, आपल्या आया बाया किती सुरक्षित आहेत आपल्याच समाजात. ज्या देशाची संस्कुर्ती अतिथी देवो भव शिकवण देते त्या देशात २००९ साली एका रशियन महिलेवर सामुहिक बलात्कार होणे या पेक्षा आपली माण शर्मेने खाली खालायला लावणारी दुसरी घटनाच असू शकत नाही. या साऱ्या घटना म्हणजे आपल्या भारतीय समाजाला लागलेला व कधीच न पुसला जाणारा कलंकच आहे. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हरियाणामधे झालेल्या एका बलात्कार प्रकरणी तेव्हाचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी बलात्कारावर एक टिप्पणी केली होती कि, महिला तर यासाठीच असतात. वास्तवीक पाहता त्यांनी फक्त या दोन ओळीचीच टिप्पणी केली नव्हती तर त्याच्या अप्रत्यक्षपणे अर्थ होता कि महिला फक्त उपभोगन्यासाठीच असतात. भारत स्वतंत्र झाल्यावर जेवढे काही नेते झालेत ते कमी जास्त प्रमाणात स्त्रियांविषयी द्वेषाने बोलणारे आणि स्त्रियांच्या स्वातंत्राच्या विरोधातच होते. त्याला बोटावर मोजन्याइतकेच अपवाद असतील. स्त्रियांना कमी लेकन्यात महिला नेत्यांचा सुद्धा काही अपवाद नव्हता. स्वातन्त्रानंतर सतत महिलांवर अश्या टिप्पण्या येत गेल्या कारण भारतीय समाज आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मीडिया या बाबतीत हवा तेवढा जागृत असलेला दिसत नाही

मागच्या दोन वर्ष्या आधी  भयानक देश हादरून टाकणारी घटना घडली. संपूर्ण देश एकाएकी झोपेतून जागून खाडकन उठला आणि आपली मुलगी सुरक्षित आहे का? आपल्याच घरात, गावात पाहू लागला. हैद्राबादच्या डॉक्टर प्रियंका सोबत घडलेली घटना वाचून त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी आधी कळलंच नाही ती घटना वाचतांना सुध्दा डोक्यात एकच गोंधळ माजलेला होता; माझी बहीण सुरक्षित तर आहे ना. हैद्राबादच्या या घटनेनंतर जर तुम्ही सोलो ट्रिप ची गोष्ट करत असाल तर तुम्हाला समजवून सांगण्या सारखं काहीच नाही. बॉस विसरून चालणार नाही कि आपण त्या देशात राहतो ज्या देशात बलात्कारानन्तर मुलींना जाळून टाकले जाते या तिच्या गुप्तांगात रॉड टाकला जातो, या पेक्षा निर्लज्ज आणि माणुसकीला काळिमा फासणारी दुसरी गोष्ट काय असू शकते. जेव्हा या मुली शाळा, कॉलेज, जॉब वरून सुखरूप घरी परत येतात ना तेव्हाच त्यांच्या आईवडिलांच्या जीवात जीव येतो. शहरात राहणाऱ्या लोकांचं तर खूपच भयानक; जो पर्यंत या मुली घरी परत येत नाही ना तो पर्यन्त यांचा जीव वरच वर असतो आणि जेव्हा ती सुखरूप परत येते तेव्हा त्यांना आजच्या दिवसाचे युद्ध त्यांनी जिंकले असे वाटायला लागते, पण दुसऱ्या दिवसाची तलवार ही टांगलेलीच असतें पुन्हा त्यांच्या डोक्यावर. तेलंगणा सरकारचच काय तर संपूर्ण भारताच मला अभिनंदन करावं लागेल. अभिनंदन भारता, अभिनंदन तेलंगना आणि अभिनंदन अजून बलात्काराला आमंत्रण देणारया सर्व राज्याला. ज्या देशाच्या संसदेत स्त्रिया फक्त नथुराम, गांधी यांच्याच नावावर राजनीती करतात त्याच देशाच्या काही स्त्रिया रोज बलात्काराला बळी पडतं असतात या त्याच संसदेत बसलेल्या स्त्रिया विसरलेल्या असतात.

          दिल्लीत झालेला गँगरेप, आसिफा रेप केस, डॉक्टर प्रियंका रेप केस असो कि काल परवाची भायखळा बलात्कार केस असो. या सर्वांनी देशाला एक दाखवून दिले आहे कि भारतातील स्त्रिया सुरक्षित नाहीत. भारतीय महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न काही केल्या सुटत नाही आहे, उलट ही स्थिती आटोक्यात येण्यासाठी खूप मोठा काळ अजून लागणार कि काय असंच झालं आहे. तस त्यांना माहिती आहे कि नाही हा सुध्दा एक मोठा प्रश्न आहे कि, अजून एका मुलीचा गँगरेप झाला आहे देशात जी आपल्या कामावरून परत येत होती. डॉक्टर असलेली प्रियंका जेव्हा रात्री कामावरून परत येत होती तेव्हा तिच्यावर मदतीच्या नावावर रेप झाला आणि तिला जाळून टाकण्यात आले. ज्या काही देशात मुली सुरक्षित नाही त्या देशाच्या यादितला आपला एक महान भारत देश, जिथे संध्याकाळ होताच मुली घरातून बाहेर पडायला भीतात आणि त्यांच्या आईवडिलांना संध्याकाळ होताच जीवात धडधड व्हायला लागते. ज्या देशात राजधानीत,उपराजधानीतच  भर रस्त्यात बलात्कार होतो आणि लोकं बघे बनत निघून जातात, हाच तो देश जिथे हैद्राबाद,मुंबई, दिल्लीसारख्या प्रगतिवान शहरात मुलीवर बलात्कार करून जिवंत जाळले जाते आणि बलात्कारी पुरावा नसल्या कारणाने कायद्याच्या सचोटीतून सुटून जातो आणि खुलेआम पुन्हा; पुन्हा एक बलात्कार करण्यासाठी मोकळा होतो. आम्ही पुन्हा एक हॅशटॅग लिहतो, क्यांडली जाळतो, श्रद्धांजली वाहतो आणि झालेली घटना विसरून, न्याय मिळो वा ना मिळो पुन्हा आपआपल्या वाटेला लागतो पुन्हा एका नव्या बलात्काराला तोंड देण्यासाठी. मला ही घटना वाचून पहिल्यांदा आपल्या सिस्टिमवर, सरकारवर आणि न्याय प्रणालीवर खूप राग आला पण मी काहीच करू शकत नाही याचा मला त्याच क्षणी अनुभव झाला. आपलेच चुकते आपण सर्व गोष्टी सरकावर लोटून देतो आणि मोकळे होतो कधी पोलिसांवर तर कधी दुसऱ्याला दोष देत. एकट्या सरकारन बदलून या सिस्टिम ला बदलून काहीच होणार नाही. आधी आपण स्वतः बदलायला हवे; बलात्काराला बघे म्हणून बघण्याआधी आणि आपल्या बरोबरच आपण बलात्कारी निर्माण करण्याऱ्या समाजाची मानसिकता बदलायला हवी. तुम्हाला काय वाटते कि बलात्कारी एका दिवसात पैदा होतो? कधीच नाही. बलात्कारी हा एका मोठ्या प्रक्रियेने जन्म घेत असतो आधी जवळच्या माणसावर कुदृष्टी टाकून, चुकीने चुकीच्या जागेवर स्पर्श करून. प्रत्येकदा आपणच त्यांना नजरअंदाज करत असतो आणि त्यामुळे त्यांना ती चूक करायला पुन्हा पुन्हा उत्तेजन मिळत असते. त्याच्या आत होणारा बदलावं त्याची आई, त्याची बहीण आणि सर्व समाज बघत असतो पण आपण प्रत्येक वेळी; मला करायचं या एकाच भावनेने लूतपुत झालेलो असतो. जाऊद्या सोडा बलात्कार तर रोजच होणार आहे जो पर्यन्त तुम्ही स्वतः एकएकाने येऊन बलात्कारी समाजाची परिस्थिती बदलवणार नाहीत तो पर्यन्त, जो पर्यन्त तुमचं लक्ष या गोष्टीकडे नसेल कि, पुढचा बलात्कारी माझ्या घरातून नको याकडे तो पर्यंत एक एक बलात्कारी जन्माला येतच राहणार आणि प्रत्येकवेळी एक निर्भया  बळी जाणार.. कदाचित होऊ शकते ती तुमच्या घरातीलच असेल.




अयान शेख (मुंबई)
       
Previous Post Next Post