पतंजलीची विक्री थंडावल्याने का चिडलेले आहेत रामदेवबाबा -

 



स्वतःला पतंजीलाचा वारसदार म्हणवून घेणारे रामदेवबाबा सध्या आपल्या बैताल वक्त्यव्यामुळे मोठ्या अडचणीत सापडले आहे.  चला तर मग जाणून घेऊया राम किसन यादव अर्थात  रामदेवबाबा यांच्या विषयी -

 रामदेवबाबा अलिओपॅथी वर का चिढतात एवढे?

लहानपणी रामदेवबाबा आजारी पडले असतांना औषधिच्या ओव्हरडोसमुळे त्यांच्या शरीराच एक भाग निकामी पडलं आणि ते मृत्यूच्या दारात जाऊन उभे राहिले. आज रामदेवबाबा दावा करतात कि, मी योगामुळे त्यावर मात करू शकलो आणि मोठ्या प्रमाणात निकामी पडलेल्या शरीराच्या भागाला पूर्ववर्त आणू शकलो असे ते म्हणतात.  दुसरीकडे स्वदेशीचा प्रचार घेऊन सत्तेत आलेल्या भाजपा सरकार नंतर रात्रौरात्री वीस हजाराच्या टर्नओव्हर पासून  वर्षाला  एक लाख कोटी पर्यंत रामदेवबाबांनी आपला व्यवसाय आणून टाकला आहे. भाजपच्या काळात रामदेवबाबा आणि भाजपात ठरल्यानुसार स्वदेशीच्या नावावर रामदेवबाबाचा उद्योग मोठया प्रमाणात वाढवला गेला, एवढेच नाही तर सत्तेतील भाजपाने स्वतःचा वाटा घेत मिहान नागपूर मधली स्टार्टअपची जागा बाळकावून अल्पमोबदल्यात रामदेवबाबांना देऊन टाकली.  परंतु सर्व काही ठीकठाक चालू असतांना मधेच करोनाने थैमान घातले आणि बघता बघता रामदेवबाबांचा उद्योग शून्याला टेकला. जिथे  जीवनमारणाचा प्रश्न समोर उभो असतो, तिथे इन्स्टंट परिणाम देणाररी औषधी हवी असतात, जे द्यायला रामदेवबाबा असक्षम ठरले व  करोनावर मात करण्यासाठी अलिओपॅथी उपचार पद्धती खूप मोलाची ठरली. बघता बघता अलिओपॅथीचा उद्योग  मोठ्या प्रमाणात उसंडी मारायला लागला आणि रामदेवबाबाचा उद्योग पार बसला.त्यामुळे रामदेवबाब अलिओपॅथीवर सध्या चिडलेले दिसतात. 


कशी झाली रामदेवबाबाच्या स्वदेशीची सुरवात -

2009 मधे रामदेवबाबा, राजीव दीक्षित आणि आचार्य बाळशास्त्री व इतरांनी मिळून भारत स्वाभिमान ट्रस्टची स्थापना केली आणि ट्रस्टचे सचिव पद राजीव दीक्षित यांना देण्यात आले. राजीव दीक्षित जिवंत असे पर्यंत त्यांनी 12000  भाषने देऊन स्वदेशीचा वापर करा आणि स्वदेशी भारताच इनकम कस वाढवेल हेच सांगितलं, त्यांनी भारतात असलेल्या जागतीक 5000 कंपन्यावर हल्लाबोल केला आणि त्यापैकी काही कंपन्याना व्यवसाय गुंडाळन्यास भाग पाडले तर यामुळे काही कंपन्याचा व्यवसाय ठप्प पडला. काँग्रेस सरकार  अंतराष्ट्रीय कंपन्याना भारतात येऊन व्यवसाय करायला परवानगी देत आणि त्यानंतर त्या कंपन्याभारतावर राज्य करतात, सेम इंग्रजासारखे  असे चित्र दीक्षित भारत बचाव आंदोलनातून उभे करायचे. मुळात ही सर्व सुरवात पुढील काळात रामदेवबाबाला उपयोगी पडणार होती, ज्यातून भारतातील सर्वात मोठा उद्योग उभा राहणार होता. स्वदेशीचा  प्रसार करण्यात दुसरीकडे काही हिंदुवादि संघटनेचा खूप मोठा हात होता ज्यात गोरक्षा हा मुद्दा उचलून धरण्यात येणार होता आणि पुढील काळात हिंदुवादि पक्षाला एकाधिकार सत्ता स्थापन करता येणार होती. भिलाई छत्तीसगड येथे 2010ला राजीव दीक्षित यांच मृत्यू झालं आणि रामदेवबाला जगासमोर नव्या रुपाने यायला पार्श्वभूमी निर्माण झाली, त्या आधी रामदेवबाबा फक्त ट्रस्टी आणि योगगुरू म्हणून कार्य करायचे. त्यांच्या व्यवसायाला सुरवात झालेली नव्हती, परंतु ज्याप्रकाराणे राजीव दीक्षित स्वदेशीघेऊन प्रसिद्ध झाले होते त्याचा फायदा पुढील काळात रामदेवबाबाला घ्यायचे होते आणि त्यांनी त्यासाठी राजीव दीक्षित यांचा काटा काढला. (असा राजीव दीक्षित यांची फॅमिली आणि मित्र परिवार आरोप करतात.

रामदेवबाबांचा पतंजली योग ट्रस्ट -

पतंजली योग रामदेवबाबाच्या योगाच्या संकल्पनेतुन निर्माण झाली, या ट्रस्टच्या अंतर्गत राजीव दीक्षित जिवंत असतांना राजीव दीक्षित आणि रामदेवबाबांच्या अंतर्गत कलहातून राजीवदीक्षितला डावलून पतंजली आयुर्वेदिक लिमिटेडची स्थापना 2006ला रामदेवबाबा आणि आचार्य बालशास्त्री यांनी केली, अध्यक्ष रामदेवबाबा तर सचिव बाळशास्त्री यांना बनविण्यात आले.  2014 ते 2019 दरम्यान एक लाख कोटी वर्षाला उलाढाल करणाऱ्या या कंपनीत रामदेवबाबाचा वाटा शून्य असणे न पटण्यासारखे आहे. 94% शेअर स्वतः बाळशास्त्री यांना मिळते तर उर्वरित 6% शेअर सुनीता पोतदार या विदेशी भारतीय महिलेला मिळतो.  स्वतःची हिस्सेसारी शून्य असतांना एकादया माणसाने एवढी उठाठेव का करावी हा संशोधनाचा विषय आहे. 

काँग्रेसवर भ्रस्टाचाराचा आरोप करणारा बाबा आज शांत का बसलाय- 

भारतातील काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचार आणि काळ्या पैश्याच्या  विरोधात  रामदेवबाबा यांनी दिल्ली येथे ४ जून २०११ रोजी रामलीला मैदानावर आंदोलन केले. त्यात मागण्या होत्या - स्विस देशांमध्ये ठेवलेल्या भारतीयांचा काळा पैसा परत आणावा व त्याचा  समावेश राष्ट्रीय संपत्तीमध्ये करावा. काळा पैसा साठवणार्‍यांना राजद्रोही म्हणून जाहीर करावे आणि त्यांना  फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी. मोठ्या रकमेच्या चलनी नोटा अर्थव्यवहारातून काढून टाकाव्यात . कारण १०० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशात आहे तो केवळ एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांमुळे. शेतकर्‍यांची लुट करणारे  ब्रिटीशांनी आणलेले कायदे  बदलून शेतकऱ्यांच्या हिताचे करावे, रामदेवबाबांनी आपल्या आंदोलनात मांडलेले सर्व मुद्दे त्यांनतर बीजेपीचे मुद्दे ठरले यात काहीच शंका नाही, पुढील काळात अन्याय कारक नोटबंदी असो कि जुलमी शेतकरी कायदे या  सर्व बीजेपीची देणी साठी रामदेवबाबा काँग्रेसच्या काळात बडबडकरायचे. ती नुसती बडबड नव्हती तर रामदेवबाबाने भाजपाचा स्वदेशीद्वारे जो RSS च्या तत्वप्रणालीत आहे चा  प्रचार प्रसार करावा व बदल्यात पुढील काळात भारतीयांना फक्त आणि फक्त स्वदेशीचा वापर करायला लावून पतंजलीमय करुन  रामदेवबाबाचा भाजपा प्रगती करुन देईल असा ठरलेला एजेंडा होता.

विवादित पतंजली प्रॉडक्ट -

मागच्या काळात माकपच्या बिंद्रा कराट यांनी रामदेवबाबा आपल्या आयुर्वेदिक प्रॉडक्ट मधे मानवी हाडे आणि प्राण्यांच्या शरीराचा काही भाग वापरत असल्याचा आरोप केला होता, त्यांच्या आरोपावरून ते प्रॉडक्ट प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आणि ते सत्य असलाचे सिद्ध झाले, त्यांनतर पतंजली आटामधे रामदेवबाबा पॉलिथिन मिसळत असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर विवादित करोनील सुद्धा केंद्रीय मंत्र्याचसोबत  रामदेवबाबाला चांगलेच भोवले. हे सर्व मुद्देअसो कि रामदेवबाबाचे चीन ला चंदन तस्करी मुद्दा असो रामदेवबाबावर सध्या भारतीयांचे शंकने नजरा टेकल्या आहेत, अलीकडे रामदेवबाबांनी 12000 हजार डॉ. च्या मृत्यूवर शंका व्यक्त केल्यामुळे ते विवादात सापडले आहेत  आणि  त्यात पून्हा आपल्या पतंजली प्रोडक्टच्या विक्रीवर करोनामुळे झालेला परिणाम बघता आणि करोनाच्या दोन वर्ष्याच्या काळात  आयुर्वेदाला अलिओपॅथीपेक्षा मिळालेली कमी मागणी पाहता रामदेवबाबाचे डोक्यावरचे कनेकशन सुटले असून ते सध्या काहीही बडबड करतांना दिसत आहेत.



- अयान शेख 








Previous Post Next Post