भीमाकोरेगाव दंगलीतील संशयीत आरोपी व मनावधिकार कार्यकर्ते यांच्या जीवाला धोका -

 

भीमा कोरेगावच्या तथाकथित दंगलीत सहभाग असल्याच्या संशयावरून तळोजा व भायखळा कारागृहात असलेले 16 विद्रोही कवी, लेखक, वकील, प्राध्यापक व मानवाधिकार कार्यकर्ते यांना आता करोनाचा धोका वाढला आहे व त्यापासून बचाव व्हावा म्हणून कारागृहात कसल्याच प्रकारची देखभाल केली जात नाही असे त्यांच्या नातेवाईका कडून कळाले. काल दि. 15 मे ला पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांच्या नातेवाईककांनी सांगितले कि,  दिल्ली युनिव्हर्सिटीची सहाय्यक प्राध्यापक हनी बाबू व सुधा भारद्वाज यांची तब्येत खूप बिघडली आहे. हनी बाबुला म्यूकरमायोसिस(डोळ्याचा) हा भयानक आजार झाला असून त्यांच्या जिवंत राहण्याचे चान्सेस खूप कमी आहेत (या आजारात डोळ्याचा भाग सडतो आणि तो काढून टाकावा लागतो). दुसरीकडे सुधा भारद्वाज यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असून त्यांना सध्या प्यायला चांगले पाणी मिळत नाही आहे. त्यांची तब्येत खूप खालावली असली तरी जेलप्रशासन त्यांची काळजी घेत नाही आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वतःची कामे अश्या स्थितीत करावी लागतात.

   दुसरीकडे फादर स्टॅनस्वामी यांना अलीकडे दिसत आणि ऐकू येत नसल्यामुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत, त्यांना ऑपरेशनची लवकरात लवकर गरज  आहे. वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमाशी बोलतांना सांगितले कि, सुरेंद्रचा चस्मा दोन महिन्या आधी तूटला असून अद्याप पर्यंत तो त्यांना बनवून दिला गेला नाही आणि मी इकडून पाठवले असता तो जेल प्रशासनाने स्वीकाराला नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी यात हा सुद्धा खेद व्यक्त केला कि, मागच्या काही दिवसा आधी सुरेंद्र गडलिंग यांच्या आईच्या मृत्यूच्या वेळी राष्ट्रीय तपासयंत्रनेच्या न्यायलयाने त्यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीला येण्यासाठी परवानगी दिली नाही.

  जातीअंताच्या चळवळीच्या, मानावाधिकार कार्यकर्ता हर्षाली पोतदार यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना कारागृहातील वैद्यकिय सुखसोईच्या आभावाविषयी खेद व्यक्त केला, त्या म्हणाल्या कि, ससुधीर ढवळे आणि वर्णन  एकाच बॅरेक मधे असून त्यांच्या बॅरेक मधे आठ जण पॉसिटीव्ह आले होते, त्यामुळे त्यांना दोन दिवसा अगोदर दुसऱ्या बॅरेक मधे हलविण्यात आले आहे. सुधीरचे सर्व कागदपत्र पोलिसांनी सील करून ठेवल्याकारणाने त्यांना आधार कार्ड विना करोनाची लस घेता आली नाही. त्यामुळे त्यांची तब्येत अलीकडे बिघडलेली असते. भीमाकारेगावच्या दंगलीत संशयीत आरोपी म्हणून कारागृहात असलेल्या महेश राऊत यांच्या विषयी बोलतांना त्यांची बहिन मोनाली राऊत म्हणाल्या कि, मी दोन दिवस अगोदर मेडिसिन, ऑक्सिमिटर आणि पुस्तके घेऊन जेलप्रशासनाला भेटली परंतु त्यांनी ते महेश ला देण्यास नाकारले.

तळोजा व भायखळा जेलमधे सध्या 800च्या वर कैदी असून मागच्या आठवड्यात करोनामुळे एका 22 वर्ष्याच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या कारागृहात 60पेक्षा जास्त कैदींचा करोनाने व वैद्यकीय सुविधेअभावी मृत्यूझाल्याचे त्यांच्या नातेवाईकानी सांगितले. कारागृहात एकच आयुर्वेदिक डॉक्टर असून, नर्स आणि स्टाफ उपलब्ध नाहीत त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याची ही योग्य व्यवस्था नसल्याचे ते म्हणाले, फादर स्टॅन स्वामी सध्या खूप बिमार असून दोन दिवसापासून त्यांच्या बाबतीत जेलमधून कोणतीच माहिती मिळाली नसल्याचे सुद्धा त्यांच्या मित्रानी सांगितले.





- अयान शेख

Previous Post Next Post