मागच्या काही दिवसापूर्वी प्रत्यक्ष बहुजनांवरील अत्याचारा विरोधातील परभणीतील एका रॅलीत सहभागी होण्याचा योग आला. दलित बहुजनांवरील वाढत्या अत्याचाराला कारणीभूत कोण आणि सध्याची त्या समाजात असलेली या गोष्टीची भीती प्रत्यक्षात पाहायला मिळाली. बहुजन वर्गात सध्या कमालीची चिंताग्रस्त आणि भीतीची सावली पसरत असतांना तीही भीती त्यांच्या चेहऱ्यावर जाणवली. मराठवाड्या सारख्या दुष्काळग्रस्त आणि सामाजिकरित्या बहिष्कार टाकलेल्या भागात तर या गोष्टी अजून महाभयंकर होऊन जातात. संविधानाच्या यशस्वी 60 वर्ष्याच्या वाटचालीनंतर सुद्धा विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुजन वर्ग अजून बाबासाहेबानी ज्या गोष्टीसाठी लढा दिला त्या गोष्टीसाठी तरसत असल्याच जाणवलं. भंडारा, गोंदिया, अमरावती, परभणी, बिड आणि नांदेड या भागात अजून भयंकर स्थिती आहे त्यांचं तर वर्णन सुद्धा करणं महाकठीण होऊन जातं. मी स्वतःच अनुसूचित जमाती मधून बिलॉंग करत असतांना आणि पत्रकारीता करत असतांना काही गोष्टी अनुभवल्या आहेतच. काही केल्या जात नाही ती जातं. समाजातील जातीअंध लोकांवर कुठल्याही प्रकारे सरकारचा आणि पोलीस यंत्रनेचा दबाव राहिलेला नाही आणि सध्याची सरकार फक्त बघ्याची भूमिका घेऊन मूग गिळून मुकाट्याने बसलेली असतें त्यामुळे कित्येकदा सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या विरोधात अन्यायग्रस्त लोक फक्त घोषणाबाजी आणि नारे देऊन धरन्यावर बसलेली आढळतात. कट कारस्थानाने सामूहिक हत्या करणे, जुन्या रूढीपरंपरा मानून दलित बहुजन समाजातील व्यक्तीला वाळीत टाकणे अथवा गावातील पूर्ण समाजावर बहिष्कार टाकणे, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणे, दलित बहुजनांच्या ध्वजाचा, श्रद्धास्थान असलेल्या प्रतिकांचा अवमान करणे, मानवी मूल्यांची अवहेलना करणे असले प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
अत्याचार येथेच संपतो का? तर नाही. अत्याचाराची इतकी छोटी व्याख्या असूच शकत नाही. पत्रकारिता करत असतांना यवतमाळातील एका गावात जाऊन पोहचलो जिथे, दलितावर अत्याचार होत नाही, आमचं गाव एकोप्याने आणि शांतीने नांदत असं मला सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात तस काहीच नव्हतं. पोलीस यंत्रनेची नाकामयाबी असो, सरकारी यंत्रणा अथवा स्वतः महिला बाल कल्याण विभागाची असो, ती गोष्ट दाबली गेली होती. यवतमाळ मधील एका गावात आदिवासी समाजाच्या एक तरुणीवर 8 वेळा बलात्कार अथवा संमतीने संभोग करून तिला 8 वेळा कुमारीमाता बनविण्यात आले आणि प्रत्येकवेळी समाजाने, गावाने ते अनदेखे केले. पाहिल्या तीन गर्भधारनेच्या वेळी वृद्ध आई वडील जिवंत होते आणि त्यांनतर त्यांचे निधन झाले तेव्हा ती थोडी मानसिक आजाराने ग्रासली होती. समोरचे 5 गर्भ हे पोट भरणाच्या लालसे पायी, बळजबरीने, मानसिक आजारात गावातील व समाजातील जातंअंधानी तिला प्रदान केले. आजही ती तरुणी जिवंत आहे आणि अश्याच परिस्थितीत ती जगतेय. ही फक्त यवतमाळ आणि अमरावतीकडल्या गोष्टी झाल्यात याही पेक्षा भयानक असते गडचिरोली, भंडारा भागातील आदिवासी लोकांच्या मुलीवर व तिथल्या आदिवासिंवर होणारे अत्याचार. या भागात सरकारी कर्मचारी, अधिकारी म्हणून जाणारे लोक, येथील स्त्रियांना आणि नाबालिक मुलींना आपल्या प्रेमाच्या नाटकात फसवून संभोग करतात आणि त्यातून त्या स्त्रियांना गर्भधारणा झाल्यावर तेथून पळ काढतात. हे सर्व प्रकरण एवढ्यातच थांबत का? मुळीच नाही. या गर्भधारनेतून मूल जन्माला आल्यावर किंवा अनैतिक गर्भधारणा झालीय कळल्यावर इथल्या स्त्रियाच आणि मुलींच आयुष्य बरबाद होऊन, ज्यात कित्येक स्त्रियांना आणि मुलींना आपल्या आयुष्याला मुखावं लागलं आहे. गोंदिया भंडारा भागात यापेक्षाही खूप भयानक भयानक स्त्रियाविषयी अत्याचार होत असतात. खैरलांजीची घटना तरइतकी भयानक होती कि त्याचे पडसाद स्वतः UNO च्या मानवी हक्क आयोगाला घ्यावा लागला होता.
गुजरात बरोबरच महाराष्ट्रात सुद्धा दर चार दिवसाआड एक दलित स्त्रियांवर अत्याचार होतो आणि त्याचे नामोनिशाण मात्र कुठेच उरत नाही. मुक्तपत्रकारिता करत असतांना एक गोष्ट मात्र मला नेहमी जाणवते कि, दलित स्त्रीयांवरील अत्याचाराची दखल हव्या त्या प्रमाणात समाजातील माध्यमे घेतांना दिसत नाहीत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील दलित स्त्रियांवरील अन्यायाची गोष्ट कधीच या कानाहुन त्या कानाला होत नाही. कित्येक स्त्रिया स्वतःच्या जाती बरोबरच इतर जातीतील लोकांना कडून शारीरिक व मानसिक दृष्ट्या रोज छळल्या जातात आणि त्यातील बरेचश्या याकारणातून आत्महत्या करुण घेतात. दलित समाजातील स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि त्यातून उद्धभवणारे कित्येक प्रश्न आज सुद्धा तसेच कोर्टाच्या पायरीवर टांगत ठेवले आहेत. कित्येक सुनवाण्या होतात आणि कित्येक निर्णय दिले जातात परंतु त्या स्त्रियांच्या अब्रूची किंमत नेहमी न्यायालय सुद्धा शून्यच ठेवत असतो.

- अयान शेख